Raj Thackeray | “नाव गेलं तर पुन्हा मिळवता येत नाही”; राज ठाकरेंनी केला तो व्हिडीओ शेअर

Raj Thackeray | मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादाचा अंत केला आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातो. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्याशिवाय पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. यावरुन आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.

“नाव आणि पैसा, पैसा येतो, पैसा जातो, पुन्हा येतो. पण एकदा का नाव गेलं की, परत येत नाही. ते येऊ शकत नाही. काळ्या बाजारात सुद्धा मिळायचं नाही. म्हणून नावाला जपा. नाव मोठं करा” अशा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील एक व्हिडीओ निकालानंतर लगेचच राज ठाकरे यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

राज ठाकरेंचं ट्वीट

बाळासाहेबांची शिवसेना आता शिंदेंची

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच याबाबत निकाल जाहीर केला. या निकालात केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळेल, असं स्पष्ट लिहिले आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलेय. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या- 

Back to top button