Uddhav Thackeray | “बाळासाहेबांनी पुजलेला खरा धनुष्यबाण आमच्याकडे कागदावरचा तुम्ही चोरला”

Uddhav Thackeray | मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादाचा अंत केला आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातो. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्याशिवाय पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर ताशेरे ओढले आहेत.

“लोकशाही संपली हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन सांगावं. निवडणूक आयोगाच्या निर्णायाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे” असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

“निवडणूक आयोगाचा हा निकाल लोकशाहीच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवी वर्षाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन 75 वर्षाचं स्वातंत्र्य संपलेलं आहे, असे जाहीर करावे. लोकशाहीला आदरांजली वाहून बेबंदशाहीला सुरुवात झाल्याचं मोदींनी जाहीर करावे. न्यायव्यवस्था दबावाखाली कशी येईल, याची अनेक उदाहरणं पाहिली आहेत. आजचा हा निर्णय अत्यंत अनेपेक्षित आहे, कारण जवळपास सहा महिने सर्वोच्च न्यायालयत सुरु आहे. त्याची आता सलग सुनावणी सुरु होईल. तो निकाल लागेल तोपर्यंत निवडणूक आयोगानं निर्णय देऊ नये”, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

“शिवसेना प्रमुखांचा फोटो चोरावा लागतोय त्यांना, शिवसेना हे नाव चोरावे लागले त्यांना, शिवसेनेचे धनुष्यबाण चोरावा लागलेला आहे, असे चोर कधीही मतदारांकडे जावू शकत नाहीत”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे-

  • हिंमत असेल तर मर्दासारखं निवडणुकीला सामोरे जाऊन दाखवावं
  • नेते गेले, जनता आमच्यासोबतच आहे
  • जनता निवडणुकीत बदला नक्कीच घेणार
  • मोदींचा चेहरा महाराष्ट्रात चालत नाही
  • त्यांना बाळासाहेबांना चोरायचं आहे.
  • दुसऱ्यांचं नाव आणि चिन्ह चोरलं
  • शिंदेंचं नाव महाराष्ट्रात चालत नाही
  • महिन्याभरात निवडणुका लागणार आहेत
  • बाळासाहेबांनी पुजलेला खरा धनुष्यबाण आमच्याकडे कागदावरचा तुम्ही चोरला
  • नामर्द कितीही मातला तरी मर्द होऊ शकत नाही
  • निवडणूक आयोगाने शेण खाल्लं
  • शिवसेना भवनावर दावा करायला काय मोगलाई आहे का?
  • रावणाकडे धनुष्यबाण पण विजय रावणाचा
  • शिवसैनिकांनो खचू नका मी खचलो नाही
  • 100 कौरव एकत्र आले म्हणजे पाडवांचा पराभव होत नाही

बाळासाहेबांची शिवसेना आता शिंदेंची

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच याबाबत निकाल जाहीर केला. या निकालात केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळेल, असं स्पष्ट लिहिले आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलेय. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या- 

Back to top button