Kishor Kadam | टीम महाराष्ट्र देशा: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल धक्कादायक आणि वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
महात्मा गांधीजींचे वडील करमचंद गांधी नसून एक मुस्लिम जमीनदार त्यांचे खरे वडील असल्याचं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.
भिडेंच्या या वक्तव्यामुळं राज्याचं राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून आलं आहे. अशात आता अभिनेते आणि कवी किशोर कदम सौमित्र यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Keeping Ajit Pawar down is part of politics – Kishor Kadam
फेसबुकवर पोस्ट करत किशोर कदम म्हणाले, “अजित पवारांना उपमुख्यमंत्री करत भिडे वृत्तीच्या माणसांना बोलतं करून अजित पवारांना हतबल करत राहणं हा राजकारणाचा भाग आहे.
आपण सगळेच या राजकारणामुळे कोंडीत सापडलो आहोत. आता हा मुद्दा शिंदेजी आणि अजितजी कसे हाताळतात हा नसून माननीय फडणविसजी या दोघांची मजा बघत बसणार नाहीत अशी अपेक्षा आहे.
तसं नसेल तर तात्काळ संभाजी नव्हे , मनोहर भिडे या भयानक विकृत वृत्तीच्या माणसाला अटक करावी अशी मी एक कलावंत म्हणून मागणी करीत आहे.”
दरम्यान, मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलन सुरू आहे.
त्याचबरोबर त्यांना अटक करण्याची मागणी देखील विरोधकांनी केली आहे. अशात अमरावतीमध्ये भिडेंविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती येथील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sambhaji Bhide | संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ! ‘त्या’ वक्तव्यावरून भिडेंच्या विरोधात गुन्हा दाखल
- Ashish Shelar | ठाकरे गटानं सरळ-सरळ पाकिस्तानला मदत केली? आशिष शेलारांचा खडा सवाल
- Yashomati Thakur | संभाजी भिडे म्हणजे देशाला तोडणारी विकृती – यशोमती ठाकूर
- Radhakrishna Vikhe Patil | रोहित पवारांना अजित पवारांचे नेतृत्व मान्य करण्यापलीकडे दुसरा पर्याय नाही – राधाकृष्ण विखे पाटील
- Sunil Tatkare | “पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले हे बहुतेक ज्योतिषी…”; काँग्रेस नेत्यांवर सुनील तटकरेंची टीका