Deepak Kesarkar | संभाजी भिडेंचा भाजपसोबत संबंध जोडणं अयोग्य – दीपक केसरकर

Deepak Kesarkar | टीम महाराष्ट्र देशा: मनोहर उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधकांनी भाजप सरकारला धारेवर धरलं आहे.

करमचंद गांधी हे महात्मा गांधीजींचे खरे वडील नसून त्यांचे खरे वडील एक मुस्लिम जमीनदार असल्याचं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे.

त्याचबरोबर अमरावतीमध्ये भिडे यांच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशात या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी भिडे यांचा भाजपसोबत संबंध जोडणं योग्य नसल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

Sambhaji Bhide is not affiliated with any political party – Deepak Kesarkar

संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, “भिडे गुरुजी स्वतंत्र आहे. त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही.

त्यांची संस्था मुलांना गडकिल्ल्यांवर घेऊन जाते. त्याचबरोबर त्यांची संस्था मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती देते. या सर्व गोष्टी संभाजी भिडे स्वतंत्रपणे करतात.त्यामुळे त्यांचा भाजपशी संबंध जोडणं योग्य नाही.”

दरम्यान, संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल मोठ विधान केलं (Deepak Kesarkar) आहे. ते म्हणाले, “करमचंद गांधी हे एका मुस्लिम जमीनदाराकडे कामासाठी जात होते.

त्यावेळी करमचंद गांधी त्या मुस्लिम जमीनदाराची मोठी रक्कम चोरून पळून गेले होते. त्यानंतर भडकलेल्या जमीनदाराने त्यांची पत्नी म्हणजेच महात्मा गांधीजींच्या आईला घरी पळवून आणले होते.

त्यानंतर त्या जमीनदाराने त्यांच्यासोबत पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे महात्मा गांधीजींचे खरे वडील करमचंद गांधी नसून ते मुस्लिम जमीनदार आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.