Dhananjay Munde | बोगस खतं-बियाणं विक्री करणाऱ्या कंपनीचा परवाना रद्द – धनंजय मुंडे

Dhananjay Munde | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये बोगस खतं-बियाणं विक्रेत्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. बोगस बियाणांमुळं राज्यातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे.

त्याचबरोबर बोगस खतं-बियाणं विक्रीमुळं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळं या समस्यांवर मात करण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

ट्विट करत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, “बोगस खतांच्या संदर्भात धुळे जिल्ह्यातून तक्रारी आल्या नंतर कृषी विभागाने तात्काळ दखल घेत कारवाई करत, ग्रीनफिल्ड ऍग्रीकेम इंडस्ट्रीज या कंपनीचा खत विक्री परवाना निलंबित केला आहे.”

The Agriculture Department will not tolerate the sale of bogus fertilizers and seeds – Dhananjay Munde

“बोगस खते-बियाणे यांची विक्री कृषी विभाग खपवून घेणार नाही. या कारवाईत सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन, बोगस खत-बी-बियाणे यांच्याबद्दल तक्रारी असतील तर शेतकरी बांधवांनी 9822446655 या नंबरवर whatsapp करावे ही विनंती”, असही त्यांनी (Dhananjay Munde) या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, काल सभागृहात बोलत असताना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी याबाबत भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “राज्यातील शेतकऱ्यांना उत्कृष्ट आणि दर्जेदार बियाणे देण्यासाठी आम्ही ‘महाबीज’ला आणखीन मजबूत करणार आहोत.

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पन्न आणि फायदा मिळण्यासाठी आम्ही महाबीज व्यवस्थापनामध्ये लवकरात लवकर सकारात्मक बदल करणार आहोत.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.