Budget Session 2023 | “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना काहीच गांभीर्य नाही, हा महाराष्ट्राचा, जनतेचा अपमान”; विरोधी पक्षाची सरकारवर आगपाखड

Budget Session 2023 | मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्या दिवसापासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून तुफान खडाजंगी पहायला मिळत आहे. अर्थसंकल्पातील विविध तरतुदींवर सध्या विधिंमडळात आज चर्चा चालू असताना सत्ताधारी बाकांवर मंत्री अनुपस्थित असल्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांकडून सरकारवर सडकून टीका करण्यात आली.

या मुद्दयावरुन विधानसभेत तुफान फटाकेबाजी झाल्याचं पहायला मिळलं. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारला गांभीर्य नसल्याची टीका करत संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil), धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना काहीच गांभीर्य नाही”- Dhananjay Munde

“जेव्हा विरोधी पक्षनेते २९३ चा ठराव मांडतात, तेव्हा किमान मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी थांबायला हवं. आत्ता इथे फक्त एक सहकारमंत्री आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे. अशा प्रकारे विरोधी पक्षनेत्यांसहित विरोधी बाकांवरच्या सदस्यांचा अपमान होत असेल, तर इथे विरोधी पक्षांनी का बोलायचं? सगळे मंत्री लॉबीमध्ये बसले आहेत. याचं सरकारला काहीही गांभीर्य नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना काहीही गांभीर्य नाही”, असं आमदार धनंजय मुंडे यावेळी सभागृहात म्हणाले आहेत. भाजपनंही उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीचा मुद्दा मांडताच अजित पवारांनी त्यावरून भाजपला सुनावलं आहे.

“हा महाराष्ट्राचा, जनतेचा अपमान आहे”, अशा घोषणा केल्या जाऊ लागल्या. त्यावर अजित पवारांनीही सरकारवर टीका करायला सुरवात केली. राज्य सरकारच्या बेशिस्तपणाबाबत मंत्र्यावर ताशेरे ओढले.

“अक्षरश: भोंगळ कारभार चालू, कुणीही गंभीर नाही” | Ajit Pawar Comment on State Government 

“मी अधिवेशन सुरू झाल्यापासून सांगतोय की यांना गांभीर्य नाही. आम्ही तर काही शब्द असे वापरतो की आम्हालाही मनाला वाईट वाटतं. पण अक्षरश: भोंगळ कारभार चालू आहे. कुणीही गंभीर नाही. पहिलं बाकडं तर मोकळंच असतं. त्यावर कुणीही नसतं. आम्हीही सरकार चालवलंय”, अशा शब्दांत अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.

“एवढाही प्रोटोकॉल लोकशाहीत पाळायची इच्छा नसेल”| Jayant Patil Criticize Ministers 

“विरोधी पक्षनेते जेव्हा बोलतात, तेव्हा सभागृहाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हजर असायला हवेत. एवढाही प्रोटोकॉल लोकशाहीत पाळायची इच्छा नसेल, तर आम्ही इथे शांत बसतो. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री इथे येईपर्यंत आम्ही काही बोलत नाही. कसं वागायचं ते आता तुम्ही ठरवा. त्यांनी किमान खेद तरी व्यक्त करा की गैरहजर होते म्हणून”, असं जयंत पाटील म्हणाले.

“तुमचे मुख्यमंत्री अडीच वर्षं सभागृहात कुठे उपस्थित होते?” |Atul Bhatkhalkar criticize Ex CM Uddhav Thackeray 

यावर भाजप आमदार अतुल भातखळकरांनी लागलीच उत्तर दिलं, “तुमचे मुख्यमंत्री अडीच वर्षं सभागृहात कुठे उपस्थित होते?” असा सवाल करताच त्यावरून अजित पवारांनी त्यांना सुनावलं. “अतुलजी, तुम्ही नीट आठवा. सभागृहात जेव्हा गरज असायची, तेव्हा असायचेच. पण उपमुख्यमंत्री म्हणून हा अजित पवार सकाळी ९ वाजल्यापासून असायचा. मी तुम्हाला प्रत्येकाला आदर द्यायचो, प्रत्येकाला सकारात्मक उत्तर द्यायचो”, अशा शब्दांत अजित पवारांनी अतुल भातखळकरांना आणि भाजपला खडेबोल सुनावले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.