Eknath Shinde | ‘शेतकरी जगला तर राज्य जगेल’ अजित पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री म्हणाले, “हे सरकार….”

Eknath Shinde | मुंबई : राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) झाल्यामुळे शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी याच मुद्द्यावरुन विरोधकांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पहायला मिळालं आहे.

Ajit Pawar Talk about Agriculture Crop And Unseasonal rain

“शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. शेतकरी जगला तर राज्य जगेल. त्यानुसार सरकारने काम करावं”, असं  विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) विधानसभेत बोलताना म्हणाले आहेत. त्यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.

CM Eknath Shinde Answered to Ajit Pawar 

सरकारने कांद्याला अतिशय तुटपुंजी मदत केली आहे. त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांना वाढीव मदत करावी अशी मागणी अजित पवार यांनी सभागृहात केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.

“नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरु”

“अवकाळी पावसाच्या संदर्भात मी नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे स्वत: नुकसान झालेल्या ठिकाणी गेले आहेत. तिथे पंचनामे सुरु आहेत. तसेच नाशिक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी देखील मी बोललो आहे. तिथेही पंचनामे सुरु आहेत. त्याचाही अहवाल ते पाठवत आहेत. आतापर्यंत झालेल्या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले आहेत. कालपासून काही ठिकाणी पाऊस सुरु आहे, त्या ठिकाणचे देखील पंचनामे सुरु आहेत”, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

“हे सरकार शेतकऱ्यांचं”

सगळे नियम डावलून शेतकऱ्यांना आपण यापूर्वीही मदत केली आहे. यावेळीही मदत करणार आहोत. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे”, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना उत्तर दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button