Share

Bhaskar Jadhav | “राष्ट्रवादी पक्ष सोडायला नको होता, भाजपची ऑफर आली तर…”; भास्कर जाधवांचं मोठं वक्तव्य

Bhaskar Jadhav | मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी २००४ साली पक्ष सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत परत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावर आता भास्कर जाधव यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

“माझ्या आयुष्यात शिवसेना कधी सोडेन असं वाटलं नव्हतं. आज ज्या पद्धतीने शिवसेनेसाठी लढत आहे, पक्षाची बाजू घेऊन उभा आहे. त्यामुळे खरा शिवसैनिक पक्ष सोडेन असं नव्हतं वाटलं. पण, नियतीच्या निर्णयापुढं आपण फिके पडतो. म्हणून मला शिवसेना सोडावी लागली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडायला नको होता. हे आजही आणि उद्याही कबूल करेन. या पक्षातून त्या पक्षात जाणं हे कदापीही चांगलं नाही”, असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.

“पक्ष सोडण्यासाठी कोणाला दोष दिला नाही”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का सोडला? असं विचारलं असता त्यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “त्याबाबत कधीही भाष्य केलं नाही. पक्ष सोडण्यासाठी कोणाला दोष दिला नाही अथवा टीका-टिप्पणी केली नाही. शिवसेना सोडली, तेव्हा एका शब्दानेही टिप्पणी केली नाही. एकंदरीत परिस्थिती पाहता राष्ट्रवादी सोडण्यासाठी सबळ कारण नाही.”

Bhaskar Jadhav Talk about NCP left

“बंडखोर आमदारांनी अनेक कारण सांगितली, आता ते उघडले पडत आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाशी हरकत घेतली, राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी युती केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जास्त निधी घेतली, अशी तीन कारण सांगण्यात आली. तुम्हाला खरोखरच बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जायचं होतं, हिंदुत्व पुढे घेऊन जाऊ असं वाटत होतं, तर मंत्रिमंडळात शपथ का घेतली,” असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे.

भाजपमध्ये जाणार का?

भाजपकडून ऑफर आली तर काय? असं विचारलं असता ते म्हणाले “भाजपची ऑफर आली तरी मी जाणार नाही, पण मी नाकाला जीभ लावत नाहीत. ज्या दिवशी शिवसेना सोडण्याची वेळ आली तेव्हापासून मी व्यथित आहे. राजकारणात कोणाच्या वाटयाला काय येईल सांगता येत नाही. मी कधी शिवसेना सोडेन असं वाटलं नव्हतं. त्यामुळे मी राजकारणात असलो तरी राजकारणावरील विश्वास उडाला आहे. जर ती भाजप अडवाणी, वाजपेयी यांची असती तर गेलो असतो. पण तत्वज्ञान सांगणाऱ्या भाजपने राजकारणाचा स्तर ओलांडला असून, महाराष्ट्राचा सुसंकृतपणा मातीत घालवला आहे. त्याची मला भयंकर चीड आहे,” असं सांगत भास्कर जाधव स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

Bhaskar Jadhav | मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी २००४ साली पक्ष सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now