Weather Update | शेतकऱ्यांनो काळजी घ्या! राज्यामध्ये आजही गारपिटीचा इशारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यामध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. अशा परिस्थितीत राज्यामध्ये शनिवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर आज विदर्भातील बहुतांश भागांमध्ये गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

राज्यामध्ये आजही गारपिटीचा इशारा (Hail warning in the state today)

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. तर आज (17 मार्च) मराठवाड्यातील जालना, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड या जिल्ह्यांमध्ये वादळी गारपीटीचा तडका बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातील अमरावती, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर या भागांमध्ये गारपिट होण्याचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

राज्यामध्ये सध्या हरभरा, गहू, द्राक्ष, करडई इत्यादी रब्बी पिकांची काढणी सुरू असताना अवकाळी पावसाने हजेरी (Weather Update) लावली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. फळबागांना देखील गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला आहे. तर वादळी पावसामुळे भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान, राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे ढगाळ वातावरण आहे, तर कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे. या बदलत्या हवामानाचा फटका शेतीतील पिकांना बसत आहे. या वातावरणाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचा संकट घोंगावत आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.