Big Breaking | महिलांसाठी आनंदाची बातमी; आजपासून एसटीने करा अर्ध्या तिकीट दराने प्रवास

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Breaking | मुंबई : काही दिवसांपूर्वी राज्यात २०२३-२०२४ अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पात अनेक निर्णय घेतले. त्यापैकी एक निर्णय अधिकाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. एसटी महामंडळाकडून महिलांना तिकिटावर ५० टक्के सूट मिळणार असल्याचा राज्य शासन अध्यादेश सादर करण्यात आला. यामुळे हा निर्णय आज यशस्वीरित्या राज्यभरात कार्यन्वित करण्यात आला आहे. हा निर्णय महिला योजनेत ग्राह्य धरला गेला आहे.

‘महिला सन्मान योजने’त आजपासून (‘Mahila Sanman Scheme’)

एसटी महामंडळाच्या तिकिटावर ५० टक्के महिलांना सूट मिळणार आहे. हा निर्णय सरकारने १७ मार्च २०२३ दिवसापासून म्हणजेच ही योजना आजपासून लागू केला आहे. हा निर्णय ‘महिला सन्मान योजना’ म्हणून ओळखला जाणार आहे. त्याचप्रमाणे अर्ध्या तिकिटातून उर्वरित रक्कम राज्यसरकार महामंडळाला देणार असल्याचे सराकरने सांगितले.

कोणत्या वाहनांमध्ये असणार ५० टक्के तिकिटाचे दर (Which Is Buses In 50 % Ticket )

राज्य सरकारच्या सर्व प्रकारच्या वाहनांचा यात समावेश होणार आहे. साधी, मिडी, निमआरामी, वातानुकूलित, शयन-असानी, शिवशाही (आसनी) शिवाई (साधी आणि वातानुकूलित) या बसमध्ये ५० टक्के तिकीटावर सूट मिळाली आहे.

ऑनलाईन पद्धतीने तिकीट आरक्षित केलं असेल तर… (If You Are Online Booking Ticket)

महिलांबाबत ५० टक्के तिकिटावर आज निर्णयाला कार्यन्वित करण्यात आले आहे. याचा फायदा महिलांना नक्कीच होईल. परंतु जर महिलांनी तिकीट आरक्षित स्वरूपात संगणकीय तसेच मोबाईल ॲपद्वारे बुकिंग केलं तर त्यांना महिला सन्मान योजना लागू होणार असल्याचं देखील सांगितलं आहे.

इतरही लोकांना ५० टक्के तिकीट (Other peoples 50 % Pay Ticket)

सध्या राज्यात वय वर्षे ७५ पर्यंतच्या वृद्धांना सरकार मोफत बस सुविधा देत आहे. त्याचप्रमाणे वय वर्षे ६५ ते ७५ झालं असेल तर त्या वृद्धांना ५० टक्के तिकीट आकारलं जात आहे. महिलांप्रमाणेच ६५ ते ७५ वय वर्षे झालेल्या वृद्धांना अर्ध्या किंमती दारात तिकीट आकारलं जातंय.

महत्वाच्या बातम्या-