Nana Patole | संभाजी भिडेंच्या माध्यमातून भाजपला महाराष्ट्र पेटवायचा आहे का? नाना पटोलेंचा खडा सवाल

Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.

करमचंद गांधी हे महात्मा गांधींचे खरे वडील नसून त्यांचे खरे वडील एक मुस्लिम जमीनदार असल्याचं वक्तव्य भिडे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे.

तर आता त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. संभाजी भिडे यांच्या माध्यमातून भाजपला महाराष्ट्र पेटवायचा आहे का? असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Will Devendra Fadnavis hang Sambhaji Bhide? – Nana Patole

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “संभाजी भिडे नेहमी महापुरुषांबद्दल अवमानकारक विधान करत असतात. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक लिहिणाऱ्याला जाहीर फाशी दिली जाणार असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं होतं.

आता संभाजी भिडे यांनी महात्मा गांधीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर फडणवीस त्यांना फाशी लावणार का?”

पुढे बोलताना ते (Nana Patole) म्हणाले, “संभाजी भिडे यांचा वापर करून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचा मणिपूर करू पाहत आहे का? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खाजगी पुरस्कार स्वीकारत आहे.

हे खाजगी पुरस्कार स्वीकारून मोदी पंतप्रधान पदाचा अपमान करत आहे. त्यामुळं आम्ही भाजप विरोधात लढा देत आहोत. ज्या पक्षांना भाजप विरोधात लढा द्यायचा आहे, त्यांनी आमच्यासोबत यावं.”

“सरकारनं विकासाच्या नावावर नागपूर शहराला भकास करून ठेवलं आहे. विकासाच्या नावाखाली नागपूरचं सौंदर्य नष्ट केलं जात आहे. सरकारनं गेल्या दोन वर्षांमध्ये पूर रेषा ओलांडून एकही घर बांधलेलं नाही.

मात्र, भाजप सरकारनं नियम मोडून तेलंगणाचे बांध बांधले आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पूर परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे”, असही ते (Nana Patole) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.