Ashok Saraf | बाईपण भारी, मात्र पुरुषांचं भारीपण कोण दाखवणार? – अशोक सराफ

Ashok Saraf | मुंबई: सध्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने रिलीज होतात अनेक रेकॉर्ड्स मोडले आहे.

या चित्रपटामध्ये सहा बहिणींनी मिळून महिलांच्या अनेक समस्यांवर भाष्य केलं आहे. या चित्रपटानंतर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

No one will come forward to show the good things of men – Ashok Saraf

‘बाई पण भारी देवा’ या चित्रपटाच्या एका विशेष कार्यक्रमामध्ये बोलताना अशोक सराफ (Ashok Saraf) म्हणाले, “बाईपण भारी आहे, हे दाखवण्यासाठी अनेक लोक पुढे येतात.

मात्र, पुरुषांचं भारीपण दाखवण्यासाठी कुणीही पुढे येणार नाही. स्त्रिया नेहमी आपल्या मनातील दुःख, भावना इत्यादी गोष्टी मैत्रिणीसमोर, नातेवाईकांसमोर किंवा नवऱ्यासमोर बोलून दाखवतात.

परंतु, पुरुषांना नेहमी आपल्या भावना मनातच ठेवाव्या लागतात. पुरुष आपले त्रास, दुःख कुणालाच कधीच सांगू शकत नाही. पुरुषांना त्यांच्या भावना मनमोकळेपणानं व्यक्त करता येत नाही. पुरुष फक्त गप्प राहून त्रास सहन करत असतात.”

दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटानं आतापर्यंत जवळपास 65 कोटी रुपयांची कमाई केली (Ashok Saraf) आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, दीपा चौधरी, रोहिणी हट्टंगडी, सुकन्या मोने आणि दीपा चौधरी या अभिनेत्या दिसल्या आहे.

दैनंदिन जीवनामध्ये आपल्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना स्वतःचा आणि स्वतःच्या जीवनाचा विचार करा, असा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.