Rohit Pawar | संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजपचा हा कट…”

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: मनोहर उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे.

करमचंद गांधी महात्मा गांधीजींचे खरे वडील नसून त्यांच्या खरे वडील एक मुस्लिम जमीनदार असल्याचं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी भाजप सरकारवर खोचक टीका केली आहे.

ट्विट करत रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “राज्यातील एक व्यक्ती कित्येक दिवसांपासून सुरवातीला महिला भगिनींबाबत, त्यानंतर महात्मा फुले, महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्याबाबत आणि आता जगभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांविषयी उघडपणे गरळ ओकत असताना सरकार मात्र काहीही कारवाई करत नाही.”

BJP MP openly favors Sambhaji Bhide – Rohit Pawar 

“उलट या दुष्प्रवृत्तीला रोखण्याऐवजी एक भाजप खासदार उघडपणे त्याची बाजू घेतो… यावरून आजच्या ज्वलंत प्रश्नावरून इतरत्र लक्ष वळवण्यासाठी भाजपनेच रचलेला हा कट असल्याचं सामान्य लोकांचं मत आहे. पण हे असंच चालू राहिलं आणि लोकांनी कायदा हातात घेतला तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल”, असही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी मोठं आणि वादग्रस्त वक्तव्य केलं (Rohit Pawar) आहे. संभाजी भिडे म्हणाले, “महात्मा गांधीजी हे करमचंद गांधी यांचे पुत्र नाही.

त्यावेळी करमचंद गांधी एका मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते. एक दिवस करमचंद गांधी त्या मुस्लिम जमीनदाराची मोठी रक्कम घेऊन पळून गेले.

त्यानंतर रागात असलेल्या जमीनदाराने त्यांची पत्नी म्हणजेच महात्मा गांधीजींच्या आईला पळवून आपल्या घरी आणले. त्यानंतर त्या जमीनदारांने त्यांच्यासोबत पत्नीसारखा व्यवहार केला. म्हणून महात्मा गांधीजींचे खरे वडील करमचंद गांधी नसून ते मुस्लिम जमीनदार आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.