Aditya Thackeray | मंत्रीपद न मिळाल्याने मिंधे गटातील लोक तोंडाला येईल ते बरळतात – आदित्य ठाकरे

Aditya Thackeray | मुंबई: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज आपल्या वरळी मतदारसंघाला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहे.

त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलत असताना त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. मंत्रीपद न मिळाल्याने मिंधे गटातील लोक तोंडाला येईल ते बरळतात, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहे.

The treacherous MLAs know their price – Aditya Thackeray

प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, “मंत्रिपद न मिळाल्यामुळे मिंधे गटातील आमदारांचा तोल आता ढासळू लागला आहे.

त्याचबरोबर ती लोक तोंडाला येईल तसे बरळत असतात. गद्दर आमदारांना त्यांची किंमत कळलेली असून जनता त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे.”

पुढे बोलताना ते (Aditya Thackeray) म्हणाले, “एक दीड वर्षात मिंधे गटातील आमदारांना त्यांची किंमत चांगलीच कळली आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना काही मिळालेले नाही.

त्यामुळे त्यांना भाव देऊन मोठं करण्याची काहीच गरज नाही. अशा सडक्या विचारांची माणसं राजकारणात टिकली याबद्दल मला आश्चर्य वाटतं आणि दुःखही होतं.”

“सध्या महानगरपालिका अधिकारी जो घोळ, भ्रष्टाचार करत आहे, त्याची किंमत त्यांना आमचं सरकार आल्यावर नक्की घ्यावी लागेल”, असा इशारा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिला आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येईल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या