Share

Satej Patil | भाजपच्या विचारधारेला सुसंगत असल्यामुळं संभाजी भिडेंकडं दुर्लक्ष केलं जात आहे का? – सतेज पाटील

Satej Patil | टीम महाराष्ट्र देशा: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

महात्मा गांधीजींचे खरे वडील करमचंद गांधी नसून त्यांचे वडील एक मुस्लिम जमीनदार असल्याचं संभाजी भिडे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.

याच पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. संभाजी भिडे भाजपच्या विचारधारेला सुसंगत असल्यामुळं त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं जात आहे का? असा सवाल सतेज पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Prithviraj Chavan is receiving death threats – Satej Patil

ट्विट करत सतेज पाटील (Satej Patil) म्हणाले, “महात्मा गांधीजींच्या बाबतीत मनोहर भिडे यांनी अवमानकारक वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याची दखल अद्याप राज्य सरकारने घेतलेली नाही.

भिडेंना अद्याप अटक झालेली नाही. त्यांच्यावर कारवाईची मागणी करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण साहेब यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे.

भिडेंशी आमचा संबंध नाही असे म्हणणाऱ्या भाजपचे नेते मात्र यशोमती ठाकूर ताई यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी करत आहेत.

गांधीजींच्या बाबत अवमानकारक बोलणाऱ्यांना अभय आणि त्याबाबत कारवाईची मागणी करणाऱ्यांना धमकी दिली जात आहे. ह्या सगळ्या घटना निषेधार्ह आहेत.

मनोहर भिडे भाजपच्या विचारधारेला सुसंगत भूमिका मांडत असल्याने त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केले जात आहे का ? बुधवारी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्य सरकारने याबाबत प्रत्यक्ष कृतीतून आपली भूमिका स्पष्ट करावी”, असही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, संभाजी भिडे यांनी महात्मा गांधीजींविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केलं (Satej Patil) होतं. ते म्हणाले, “करमचंद गांधी एका मुस्लिम जमीनदाराकडं कामाला होते.

एक दिवस ते त्या मुस्लिम जमीनदाराची मोठी रक्कम घेऊन पळून गेले. त्यानंतर चिडलेल्या जमीनदारानं त्यांची पत्नी म्हणजेच महात्मा गांधीजींच्या आईला पळवून घरी आणलं.

त्यानंतर त्या मुस्लिम जमीनदारानं  त्यांच्यासोबत पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळं महात्मा गांधीजींचे खरे वडील करमचंद गांधी नसून ते मुस्लिम जमीनदार आहे.”

महत्वाच्या बातम्या

Satej Patil | टीम महाराष्ट्र देशा: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now