Share

K. Chandrashekar Rao | BRS प्रमुख केसीआर पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, ‘या’ नेत्याची घेणार भेट

K. Chandrashekar Rao | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशात तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर म्हणजेच के. चंद्रशेखर राव पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने एन्ट्री करणाऱ्या बीआरएस पक्षाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. केसीआर राज्यामध्ये पक्ष वाढीसाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. KCR will … Read more

Published On: 

K. Chandrashekar Rao | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशात तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर म्हणजेच के. चंद्रशेखर राव पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने एन्ट्री करणाऱ्या बीआरएस पक्षाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. केसीआर राज्यामध्ये पक्ष वाढीसाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे.

KCR will come to Kolhapur at 10 am tomorrow

केसीआर (K. Chandrashekar Rao) उद्या (01 ऑगस्ट) सकाळी दहा वाजता कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर ते वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे.

या कार्यक्रमानंतर ते शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, उद्या कोल्हापूरमध्ये केसीआर (K. Chandrashekar Rao) हजेरी लावणार आहे. तर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुणे दौऱ्यावर आहे.

या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. मोदींच्या या दौऱ्याला युवक काँग्रेसकडून विरोध करण्यात आला आहे. युवक काँग्रेसकडून मोदीच्या विरोधात पुण्यात जागोजागी बॅनर्स लावण्यात आले आहे.

पुण्यात युवक काँग्रेसकडून ‘मन की बात बंद करो मनिपुर की बात करो’, ‘देश जळत असताना पुरस्काराच्या मेजवान्या का?’, ‘गो बॅक क्राईम मिनिस्टर’ अशा मजकुराचे बॅनर लावण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही