Chhagan Bhujbal | नाशिक: संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद सुरू झाला आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे खरे वडील करमचंद गांधी नसून एक मुस्लिम जमीनदार असल्याचं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे.
यानंतर राजकीय नेत्यांकडून संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. अशात छगन भुजबळ यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी भिडे यांच्या विरुद्ध सरकारनं ठोस पावलं उचलायला हवी, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
Sambhaji Bhide is not ready to accept August 15 – Chhagan Bhujbal
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, “संभाजी भिडे यांनी यापूर्वी महात्मा फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी आता महात्मा गांधी यांच्या विरोधात मोठं विधान केलं आहे.
संभाजी भिडे यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? की त्यांच्याकडून कुणी हे सर्व बोलून घेत आहे? हे एकदा तपासण्याची अत्यंत गरज आहे. त्याचबरोबर भिडे 15 ऑगस्टला सुद्धा स्वीकारायला तयार नाही.
त्यामुळं त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक व्हायला पाहिजे. भिडे सध्या राज्यातील वातावरण दूषित करण्याचं काम करत आहे. म्हणून सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्या विरोधात कारवाई करायला पाहिजे.”
दरम्यान, संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहे.
त्याचबरोबर त्यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी (Chhagan Bhujbal) सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. मनोहर भिडे भाजपच्या विचारधारेला सुसंगत भूमिका मांडत असल्याने त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केले जात आहे का? असा सवाल सतेज पाटील यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | संजय राऊत शरद पवारांवर नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- Yashomati Thakur | काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना ट्विटरवरून जीवे-मारण्याची धमकी
- K. Chandrashekar Rao | BRS प्रमुख केसीआर पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, ‘या’ नेत्याची घेणार भेट
- Rohit Pawar | संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजपचा हा कट…”
- Satej Patil | भाजपच्या विचारधारेला सुसंगत असल्यामुळं संभाजी भिडेंकडं दुर्लक्ष केलं जात आहे का? – सतेज पाटील