🕒 1 min read
Sanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या (01 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने नरेंद्र मोदींना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.
यासाठी पंतप्रधान मोदी उद्या पुण्यात दाखल होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यानिमित्त नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) एकाच व्याजपीठावर दिसणार आहे.
Narendra Modi and Sharad Pawar will be seen on the same stage
नरेंद्र मोदी पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यामध्ये येणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार आहे.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीवर होणारे वार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवारांनी उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं योग्य ठरणार नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामुळे संजय राऊत शरद पवारांवर नाराज असल्याचं बोललं जात आहे.
शरद पवारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावू नये, असं मत महाविकास आघाडीतील नेत्यांनी मांडलं आहे. त्याचबरोबर शरद पवार गटातील नेते देखील यामुळे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे.
आता शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले (Sanjay Raut) आहे.
दरम्यान, शरद पवारांनी मोदींसोबत एका मंचावर बसू नये. त्याचबरोबर पवारांनी या कार्यक्रमाला जाऊ नये, अशी विनंती पुण्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
महाविकास आघाडीतील काही नेते शरद पवारांची भेट घेऊन या संदर्भात त्यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं बोललं (Sanjay Raut) जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- Yashomati Thakur | काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना ट्विटरवरून जीवे-मारण्याची धमकी
- K. Chandrashekar Rao | BRS प्रमुख केसीआर पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, ‘या’ नेत्याची घेणार भेट
- Rohit Pawar | संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजपचा हा कट…”
- Satej Patil | भाजपच्या विचारधारेला सुसंगत असल्यामुळं संभाजी भिडेंकडं दुर्लक्ष केलं जात आहे का? – सतेज पाटील
- Aditya Thackeray | मंत्रीपद न मिळाल्याने मिंधे गटातील लोक तोंडाला येईल ते बरळतात – आदित्य ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










