Amol Mitkari | संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “मनू आजही जिवंत…”

Amol Mitkari | टीम महाराष्ट्र देशा: मनोहर उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल खळबळजनक विधान केलं आहे.

महात्मा गांधीजींचे खरे वडील एक मुस्लिम जमीनदार असल्याचं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.

त्याचबरोबर त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात आली आहे. या प्रकरणावर आता अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

I have read Manusmriti – Amol Mitkari

अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत अमोल मिटकरी म्हणाले, “मी मनुस्मृती वाचली आहे.

शूद्र आणि अंत्यज यांच्या विषयी मनुस्मृतीमध्ये किती विष पेरलय याची कल्पना ती वाचल्यानंतर ” विवेक” जागृत असलेल्या वाचकांनाच येते.

मनुचा काळ संपला आणि मनुही संपला असे वाटत होते. मात्र, मनु आजही जिवंत आहे या भिडूच्या रूपात. #बहुजनांनोसावधान”

दरम्यान, अमरावतीमध्ये बोलत असताना संभाजी भिडे यांनी महात्मा गांधीजींच्या वडिलांविषयी म्हणजेच करमचंद गांधींविषयी वादग्रस्त विधान केलं (Amol Mitkari) आहे.

ते म्हणाले, “महात्मा गांधी हे करमचंद गांधींच्या चौथ्या पत्नीचे पुत्र आहे. त्यावेळी करमचंद गांधी एका मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते.

एक दिवस त्या जमीनदाराने मोठी रक्कम घेऊन करमचंद गांधी पळून गेले होते. त्यानंतर चिडलेल्या जमीनदाराने करमचंद गांधी यांच्या पत्नीला पळवून घरी आणले.

मग त्याने त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. म्हणून महात्मा गांधीजींचे खरे वडील करमचंद गांधी नसून ते मुस्लिम जमीनदार आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.