Bacchu Kadu | “हे एखाद्या मुस्लिमानं म्हटलं असतं तर…”; संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

Bacchu Kadu | टीम महाराष्ट्र देशा: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचे खरे वडील करमचंद गांधी नसून एक मुस्लिम जमीनदार असल्याचं विधान संभाजी भिडे यांनी केलं.

त्यांच्या या विधानावर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशाबद्दल बोलणारा हिंदू असो वा मुस्लिम त्याला शिक्षा झालीच पाहिजे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Those who talk about Mahatma Gandhi should be crushed – Bacchu Kadu

प्रसार माध्यमांशी बोलत असताना बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, “संभाजी भिडे यांचा जन्म स्वातंत्र्यापूर्वी झालेला आहे. मात्र, देशाच्या स्वातंत्र्यांमध्ये त्यांचं योगदान काय आहे?

त्यांनी स्वातंत्र्यासाठी एखादी लाठी तरी खाल्ली आहे का? महात्मा गांधी यांच्याबद्दल बोलत असताना त्यांनी आधी आपली औकात तपासायला पाहिजे. महात्मा गांधी यांच्याबद्दल बोलणाऱ्यांच्या नांग्या ठेचल्या पाहिजे.”

पुढे बोलताना ते (Bacchu Kadu) म्हणाले, “आपल्या देशामध्ये फक्त महात्मा गांधीच नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलही बोललं गेलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मध्यंतरी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल मोठं विधान केलं होतं. राहुल गांधीनंतर आता संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन अशी विधानं केली जातात, हे अत्यंत चुकीचं आहे.”

“एखाद्या मुस्लिम व्यक्तीनं या प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य केलं असतं तर सगळे लगेच पेटून उठले असते. त्याला लगेच देशद्रोही घोषित केलं असतं.

त्याचबरोबर त्याला या देशातून बाहेर काढून टाकण्यासाठी प्रयत्न केले असते. मात्र, देशाबद्दल हिंदू असो वा मुस्लिम कुणी काहीही बोललं तर त्याला लगेच शिक्षा व्हायला पाहिजे.

यासाठी मी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विनंती करणार आहे”, असही ते (Bacchu Kadu) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.