Varsha Gaikwad | मोदींसोबत एका व्यासपीठावर जाण्यापूर्वी पवारांनी एकदा विचार करावा – वर्षा गायकवाड

Varsha Gaikwad | टीम महाराष्ट्र देशा: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या (01 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे.

हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मोदी पुण्यामध्ये येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित राहणार आहे.

Sharad Pawar and Narendra Modi will be seen on the same stage

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवार आणि नरेंद्र मोदी पहिल्यांदाच एका व्यासपीठावर दिसणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेते नाराज असल्याच्या (Varsha Gaikwad) चर्चा सुरू आहे.

महाविकास आघाडीवर होणारे वार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवारांनी उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं उचित नसल्याचं महाविकास आघाडीतील नेत्यांकडून म्हटलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी देखील शरद पवारांना विनंती केली आहे.

वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) म्हणाल्या, “महाविकास आघाडी म्हणून मी शरद पवार साहेबांना विनंती करते की त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करावा.”

शरद पवार यांनी मोदींसोबत एका मंचावर बसू नये. त्याचबरोबर त्यांनी या कार्यक्रमाला जाऊ नये, अशी विनंती पुण्यातील जेष्ठ नेत्यांनी शरद पवारांकडे केली आहे. या सर्व चर्चांनंतर शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

दरम्यान, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये दाखल होणार आहे. मोदींच्या या दौऱ्याला युवक काँग्रेसकडून विरोध दर्शविण्यात आला आहे.

‘मन की बात बंद करो मनिपुर की बात करो’, ‘देश जळत असताना पुरस्काराच्या मेजवान्या का?’, ‘गो बॅक क्राईम मिनिस्टर’ अशा मजकुराचे बॅनर युवक काँग्रेसकडून लावण्यात (Varsha Gaikwad) आले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.