Sudhir Mungantiwar | “जय श्री राम म्हटलं की, राक्षस…”; सुधीर मुनगंटीवारांनी अमोल मिटकरींना डिवचलं

Sudhir Mungantiwar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ‘जय श्रीराम म्हटलं की धडकी भरतेय’, असे म्हणत ‘जय श्रीराम’ म्हणण्याला  त्यांनी विरोध करत नव्या वादाला तोंड फोटले आहे. अमोल मिटकरींच्या या वक्तव्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी अमोल मिटकरी यांना डिवचले आहे.

“‘जय श्रीराम’ हा शब्द ऐकल्यावर राक्षस घाबरायचे, प्रभू राम राक्षसांच्या कैदेतून माता सीतेला मुक्त करण्यासाठी गेले होते तेव्हा ‘श्रीराम’ हा शब्द दगडावर लिहिला आणि ते पाण्यावर दगड तरंगू लागले होते. ‘श्रीराम’ हा शब्द ऐकल्यावर राक्षस घाबरायचे त्यांच्या मनात भीती निर्माण व्हायची”, असे सांगत सुधीर मुनगंटीवार यांनी अमोल मिटकरींना अप्रत्यक्षपणे राक्षस म्हटले आहे.

“राम राम हा आदराचा शब्द आहे. मात्र ‘जय श्रीराम’ म्हटलं की, धडकी भरतेय”, असे अमोल मिटकरी पुण्यातील राजगुरुनगर येथील साहेबराव बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

“अमोल मिटकरी यांनी जय श्रीराम म्हणल्यावर धडकी भरतेय असं म्हटलं. आंदोलनावेळी जय श्रीराम म्हटलं जातं. मग रामाने दहशत शिकवलीय का? रामाने सावत्र भाऊ असलेल्या भरताला नंदीग्रामची गादी दिली. मग ज्याचं जय श्रीरामवर प्रेम असेल त्यांनी स्वत:च्या सख्य्या भावाला दोन एकर शेती तरी द्यावी”, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या