Share

“महाराष्ट्रातला एक बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे, त्याला…”; Sanjay Raut यांचा रोख कुणाकडं?

Sanjay Raut has posted a photo of a goat standing on a wooden stake on his X account.

Published On: 

Sanjay Raut has criticized Eknath Shinde by tweeting a photo of a goat.

Sanjay Raut। राज्यातील राजकीय वातावरण अनेक मुद्द्यांवरून तापलेलं असताना सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या मालिका सुरूच आहेत. अशातच खासदार संजय राऊत यांनी खाटकाच्या लाकडावर उभ्या असलेल्या एका बोकडाचा फोटो एक्स अकाउंटवर पोस्ट केला आहे. त्यानंतर ‘ए सं शि’ असा उल्लेख करत ‘खबर पता चली क्या?’ अशी पोस्ट लिहिली आहे. संजय राऊत यांचं हे ट्विट चर्चेत आलं असून त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut Criticized Eknath Shinde  

या पोस्ट बद्दल त्यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, “तुम्ही सगळेजण पत्रकार आहात. त्या फोटोचा अर्थ तुम्ही काढू शकता. तुम्ही ते लाकूड गावात खाटकाच्या दुकानात पाहिलं असेल. तसंच महाराष्ट्राच्या बकऱ्याला खाटकाच्या लाकडावर उभं केलं आहे. त्याला दिल्लीतून सांगण्यात आलंय की, फार शहाणपणा करू नकोस. गप्प राहायचं आणि बेबे करायचं.”

‘ए सं शि’ गट म्हणजे काय ते तुम्हाला कळलं पाहिजे. पुढच्या दोन ते तीन दिवसात माझ्या ट्विट चा अर्थ तुम्हाला कळेल, असंही संजय राऊत म्हणालेत. त्याचबरोबर आता बकरा कापण्याची सगळी तयारी झाली असल्याचं संजय राऊत यांनी म्हंटलंय.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही