Narayan Rane । राज्यातील राजकीय वातावरण विविध मुद्द्यांवरून तापलेलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतील तेव्हा हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि मासे ठेवू नका, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
Narayan Rane criticized Uddhav Thackeray
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेने कोकणाला काय दिले?, असा सवाल देखील नारायण राणेंनी केलाय. अडीच वर्षात त्यांनी दिलेल्या पैशांची आकडेवारी जरा पाहा. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला किती पैसे दिले? त्यांना कोकणावर बोलायचा काहीही अधिकार नाही. कोकणात येण्याचाही त्यांना अधिकार नाही, असे नारायण राणे म्हणाले.
‘उद्धव ठाकरे हे केवळ मासे, मटण खाण्यासाठीच ते कोकणात यायचे, त्यामुळेच ते ज्या दिवशी येतील त्या दिवशी कोंबडी मासे आणि वडे बंद ठेवा’, असा आदेश नारायण राणे (Narayan Rane) यांनी हॉटेल व्यवसायिकांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :