Udayanraje Bhosale । किल्ले रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या शिल्पावरून सुरू असलेला वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोल्हापूर गादीचे छत्रपती घराण्याचे वंशज तथा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याचं स्मारक रायगडावरून हटवण्यात यावं, अशी मागणी करणारं पत्र राज्य सरकारला दिलं आहे. मात्र, त्यांच्या या मागणीनंतर वाघ्या कुत्र्याच्या ऐतिहासिक संदर्भांबाबत शोध घेतले जाऊ लागले आहेत.
खरंच शिवरायांकडे वाघ्या नावाचा असा कुठला कुत्रा होता का? यावर चर्चा सुरू झाली आहे. अशातच भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी पुन्हा एकदा या प्रकरणावर भाष्य केलं आहे. वाघ्या कुत्र्याचे शिल्प काढून फेकून देण्याची मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
Udayanaraje Bhosale On Waghya Dog Monument
एवढ्या लांब कानाचा कुत्रा भारतीय असू शकतो का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. “एवढ्या लांब कानाचं कुत्रं इंडियामध्ये बघितलय का? ही ब्रिटिश कुत्री आहे. फेकून टाका, जास्त कौतुक कशाला हवं”,अशा भाषेत उदयनराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे
महत्वाच्या बातम्या :