Share

वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून संभाजीराजेंची भूमिका ठाम, “समाधी हटवावीच लागेल”

Sambhajiraje Chhatrapati has reiterated his demand to remove the memorial of the Waghya dog near Chhatrapati Shivaji Maharaj’s samadhi at Raigad Fort. He stated that Waghya is a fictional figure born out of folklore, with no historical basis, and its presence beside the samadhi is inappropriate.

Published On: 

Sambhajiraje Demands Remove of Waghya Dog

मुंबई | प्रतिनिधी

छत्रपती संभाजीराजे यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत आपली ठाम भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. “वाघ्या कुत्र्याचं कुठलंच ऐतिहासिक अस्तित्व नाही, ते केवळ दंतकथांवर आधारित आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ अशा काल्पनिक पात्राची समाधी असणे अयोग्य आहे,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.

संभाजीराजेंनी सांगितलं की, “मी सुरुवातीपासूनच स्पष्ट भूमिका घेतली आहे की वाघ्या कुत्रा हटवावा. तुकोजीराव होळकर महाराजांनी रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीच्या पुनरुद्धारात मोलाची भूमिका बजावली होती, मात्र वाघ्या कुत्र्याच्या समाधीला त्यांनी काही मदत केली नव्हती. तुकोजीराव होळकरांचं नाव सोन्याच्या अक्षरांनी लिहिलं जावं यासाठी मी रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्ष म्हणून पुढाकार घेतो आहे.”

Sambhajiraje Demands Remove of Waghya Dog

संभाजीराजेंनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचंही सांगितलं. “मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं आहे की, लवकरच एक समिती स्थापन करण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगडला येणार असल्यामुळे मी हा विषय थांबवला होता. मी याच विषयासाठी मुंबईत आलो असल्याचे” संभाजीराजेंनी सांगितले.

यावेळी बोलताना संभाजीराजे शिवस्मारका बद्दल म्हणाले की, “मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभं राहावं, मग ते अरबी समुद्रात असो किंवा राजभवनात. पण महाराजांचं स्मारक व्हावं,” असं त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही