Share

Farmer Fund Scam | ५० कोटींचा अतिवृष्टी पीकअनुदान घोटाळा उघड; तहसीलदारांचं लॉगिन वापरुन मोठा घोटाळा!

A major Farmer Fund scam involving ₹50 crore has surfaced in Jalna district. department officials allegedly misused Tahsildar login credentials to fraudulently claim excess crop damage compensation meant for farmers affected by excessive rainfall in 2022-23.

A three-member investigation committee—comprising Assistant Collector Pulkit Singh, Deputy Collector Manisha Dandge, and Naib Tehsildar Neelam Lunawat—was formed after complaints surfaced in late 2023.

The probe found instances of duplicate beneficiaries, forged documents, and fabricated lists submitted by village-level officials including Talathis and Gram Sevaks across 75 to 80 villages in Ambad and Ghansawangi talukas.

Published On: 

Farmer Fund Scam

🕒 1 min read

जालना | प्रतिनिधी

जालना जिल्ह्यात अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी मंजूर करण्यात आलेल्या शेतकरी पीक अनुदानातून ( Farmer Fund Scam ) तब्बल ५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही रक्कम तहसीलदारांच्या लॉगिनचा वापर करून तलाठी, ग्रामसेवक आणि मंडळ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावे बनावट यादी तयार करून उचलल्याचा आरोप आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या समितीनं प्राथमिक तपासात डुप्लिकेट लाभार्थी, बोगस याद्या, आणि कागदपत्रांत छेडछाड यांसारख्या गंभीर अनियमितता उघड केल्या आहेत. नोव्हेंबर–डिसेंबर २०२३ दरम्यान काही शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या, त्यावरून त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती.

50 Crore Farmer Fund Scam in Jalna

अंबड व घनसांगवी तालुक्यातील सुमारे ७५ ते ८० गावांमधील प्रकरणांवर सध्या चौकशी सुरू आहे. संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक यांना समितीने चौकशीसाठी बोलावून त्यांच्या याद्यांची फेरतपासणी केली जात आहे. तरीही, अंतिम यादी व चौकशी अहवाल अद्याप पूर्ण झालेला नाही.

त्रिसदस्यीय चौकशी समितीमध्ये कोण?

  1. पुलकित सिंह – सहाय्यक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी, अंबड

  2. मनीषा दांडगे – उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना

  3. नीलम लुणावत – नायब तहसीलदार, रोजगार हमी योजना, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना

जालना जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले होते. यावरून शासनाकडून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती. मात्र त्याचाच गैरफायदा घेत काही कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे हडप केल्याचा आरोप आहे.

प्रशासनाकडून अद्याप अधिकृत आकडा जाहीर करण्यात आलेला नसला तरी, प्राथमिक अंदाजानुसार ५० कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे. मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश होण्याची शक्यता असल्यामुळे ही चौकशी राज्यपातळीवरही महत्त्वाची ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही