Sambhajiraje Chhatrapati । राज्यात मागील काही दिवसांपासून रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिले होते.
अशातच आता संभाजीराजे छत्रपती यांनी थेट बड्या नेत्यांना चॅलेंज दिले आहे. “वाघ्या कुत्रा होता की नव्हता? याबाबतची भूमिका राजकीय नेत्यांनी स्पष्ट करावी. इतके सगळं होत असताना सरकार आणि विरोधकांनीही गप्प बसायचं का?,” असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला.
“वाघ्यावर काही बोलायचे नाही, फक्त समिती स्थापन करा, असं का म्हणायचे? हे बरोबर नाही. सरकार याबाबत काही समिती स्थापन करायची असेल तर ते करू शकते, पण राज्यातील सगळ्या प्रमुख नेत्यांनी शरद पवार (Sharad Pawar), राज ठाकरे (Raj Thackeray), देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेसच्या नेत्यांनी किमान एक बाजू तरी घ्यावी,” असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
“ज्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी आपले बलिदान दिले, त्यांच्या समाधी धुळखात पडल्या आहेत. पण ज्याचा स्वराज्याशी काहीच संबंध नाही, काल्पनिक दंत कथेतून तयार झालेलं हे वाघ्या कॅरेक्टर आहे,” असे देखील संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केले.
Sambhajiraje Chhatrapati on Waghya Statue
पुढे ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या उंचीपेक्षा या कुत्र्याचं स्मारक मोठे उभे करत आहात. हे कोणत्याही शिवभक्ताला आणि नेत्यांना चालेल का? वाघ्या कुत्र्याचा काहीच संबंध नाही, असेही इतिहास अभ्यासक म्हणतात,” असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :