Vivo X200 Ultra । विवो सतत आपले धमाकेदार स्मार्टफोन (Vivo Smartphone) लाँच करत असते. कंपनीच्या स्मार्टफोनला बाजारात जास्त मागणी असते. कंपनीचे काही फोन महाग असतात तर काही फोन कमी किमतीत खरेदी करता येतात.
जर तुम्ही कंपनीचा नवीन फोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनी सध्या X200 Ultra लाँच करण्याची तयारी करत आहे. तसेच X200s देखील चीनमध्ये लाँच केला जाईल.
Vivo X200 Ultra स्मार्टफोन एप्रिलमध्ये लाँच करण्यात येईल, पण फोन कधी लाँच होणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. कंपनी नवीन इमेजिंग टेक्नॉलॉजीचा वापर करेल. यात 200 मेगापिक्सलचा Samsung HP9 कॅमेरा असण्याची शक्यता आहे.
त्याशिवाय फोनमध्ये 50 मेगापिक्सलचे दोन Sony LYT-818 कॅमेरा मिळेल. फोनच्या फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉल्ससाठी 50 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. प्रोसेसर म्हणून Snapdragon 8 Elite मिळू शकतो. यात 2K रिजोल्यूशनसह क्वॉड कर्व्ड डिस्प्ले मिळेल.
Vivo X200 Ultra Launch in India
Vivo X200 Ultra हा फोन तुम्हाला व्हाइट, रेड आणि ब्लॅक कलरमध्ये खरेदी करता येईल. या स्मार्टफोनमध्ये iPhone सारखा अॅक्शन बटन मिळेल. हा बटन या स्मार्टफोनच्या उजव्या फ्रेमच्या खालच्या बाजूला असेल. ज्याचा वापर तुम्ही फोटो काढणे आणि व्हिडीओसाठी करू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :