Vivo T4x 5G । जर तुम्हाला विवोचा स्मार्टफोन (Vivo smartphone) खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने नुकताच आपला Vivo T4x 5G हा फोन लाँच (Vivo T4x 5G Launch) केला आहे. कंपनीचा हा नवीन फोन तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये खरेदी करता येणार आहे.
कंपनीच्या नवीन फोनमध्ये तुम्हाला मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 चिपसेट आणि 6500mAh बॅटरी पाहायला मिळेल. फोनच्या बेस मॉडेल 6GB RAM सह 128GB इंटरनल स्टोरेज असून तो तुम्हाला 13,999 रुपयांना खरेदी (Vivo T4x 5G Price) करता येईल.
8GB RAM आणि 256GB स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 16,999 रुपये असेल. येत्या 12 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून हा फोन Pronto Purple आणि Marine Blue कलरमध्ये फ्लिपकार्ट, विवो इंडियाची अधिकृत वेबसाइट आणि निवडक ऑफलाइन स्टोअर्समध्ये खरेदी करता येईल. हे लक्षात घ्या की पहिल्या सेलमध्ये फोनवर 1000 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट असेल. पण ही ऑफर (Vivo T4x 5G offer) AXIS आणि HDFC बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यानंतर देण्यात येईल.
Specifications of Vivo T4x 5G
स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर कंपनीच्या नवीन 5G फोनमध्ये 6.72-इंचाचा डिस्प्ले मिळेल. तो 2408 x 1080 पिक्सेलसह येत असून तो फुल एचडी+ रिझोल्यूशनसह येईल. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट मिळेल. (Vivo T4x 5G Features)
तसेच यात तुम्हाला 4nmप्रोसेससह MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर सपोर्ट आणि 2.5GHz CPU पीक स्पीड पाहायला मिळेल. कंपनीचा हा फोन अँड्रॉइड 15 वर बेस्ड Funtouch OS 15 वर चालेल. यात ड्युअल कॅमेरा सेन्सर्ससह 50MPचा प्रायमरी कॅमेरा मिळेल.
जो एआय इरेजर, एआय फोटो एन्हांस, एआय डॉक्युमेंट्स इत्यादी अनेक एआय फीचर्ससह येईल. कंपनीच्या या फोनमधील कॅमेऱ्यासाठी ऑटोफोकस सपोर्ट मिळेल. यामध्ये 50MP AI मेन कॅमेरा आणि 2MP बोकेह कॅमेरा पाहायला मिळेल. या फोनमध्ये पुढील बाजूला 8MP कॅमेरा आणि कंपनीने 44W फ्लॅशचार्ज सपोर्ट मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या :