Share

25 वर्षानंतर Champions Trophy Final मध्ये भिडणार भारत-न्यूझीलंड, कधी आणि कुठे होणार सामने? जाणून घ्या

by MHD
India vs New Zealand in Champions Trophy Final 2025

Champions Trophy Final । सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy 2025) स्पर्धेमध्ये फायनल गाठली आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव करत फायनलमध्ये एंट्री केली आहे.

त्यामुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारत-न्यूझीलंडमध्ये (India vs New Zealand) अंतिम सामना पार पडणार आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाचे या सामन्यांकडे लक्ष लागले आहे. दोन्ही बलाढ्य संघ विजयासाठी आटोकाट प्रयत्न करतील, यात काही शंकाच नाही.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 2000 साली म्हणजे 25 वर्षांपूर्वी भारत (Team India) आणि न्यूझीलंड हे दोन संघ पोहचले होते. त्यावेळी न्यूझीलंडने भारताला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले होते. त्यामुळे आता भारतीय संघ 25 वर्षांनी पराभवाचा बदला घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

9 मार्च रोजी हा सामना रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरुवात होणार आहे. तुम्ही हे सामने घरबसल्या टीव्हीवर किंवा स्मार्टफोनवर पाहू शकता.

ICC Champions Trophy 2025 Match Where To Watch On TV?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स 18 वर होणार आहे.

ICC Champions Trophy 2025 Match Live Streaming Details

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने लाईव्ह स्ट्रीमिंग जिओस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

Team India for Champions Trophy 2025

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद. शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.

Team New Zealand for Champions Trophy 2025

मिचेल सँटनर (कॅप्टन), विल यंग, ​​रचीन रवींद्र, केन विलियमसन, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मॅट हेनरी, कायल जेमीन्सन आणि विलियम ओरूर्के.

महत्त्वाच्या बातम्या :

In the Champions Trophy Final, the final match will be played between two teams, India and New Zealand. The entire cricketing world is paying attention to these matches.

Sports Cricket Marathi News

Join WhatsApp

Join Now