Share

Uddhav Thackeray एकनाथ शिंदेंवर आक्रमक; अबू आझमी व निलम गोऱ्हे यांच्या निलंबनाची मागणी

Uddhav Thackeray

मुंबई । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज विधिमंडळाच्या सभागृहात हजेरी लावत विविध मुद्द्यांवर जोरदार भूमिका मांडली. त्यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर जोरदार हल्ला चढवत, त्यांच्या तात्पुरत्या निलंबनाऐवजी किमान पाच वर्षांसाठी निलंबन करण्याची मागणी केली. औरंगजेबाच्या समर्थनार्थ वक्तव्य केल्यामुळे अबू आझमी यांच्या विरोधात सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्ष एकत्र आले आणि त्यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी निलंबन मंजूर करण्यात आले.

याचवेळी त्यांनी ‘छावा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल समाधान व्यक्त करत म्हटले, “संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट दाखवण्याचा निर्णय योग्य आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्यगाथा दाखवणारे चित्रपटही दाखवले पाहिजेत. सूरतेच्या मोहिमेचे महत्त्व नव्या पिढीला कळले पाहिजे. गद्दारांना हा इतिहास नक्कीच दाखवायला हवा. त्यांनी नाव न घेता शिवसेना (एकनाथ शिंदे गट) वर जोरदार निशाणा साधला.

Neelam Gorhe यांच्या निलंबनाची मागणी

अबू आझमींबरोबरच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या निलंबनाची मागणी करत म्हटले, “आमच्याकडून अविश्वास प्रस्ताव आणायला थोडा उशीर झाला, पण आजवर त्या निलंबित व्हायला हव्या होत्या. यावर लवकरच चर्चा अपेक्षित आहे. शिवाय, पक्षांतराचा मुद्दाही गंभीर आहे.” निलम गोऱ्हे यांच्या मर्सिडीज गाडीबाबत झालेल्या टीकेवर भाष्य करताना ठाकरे म्हणाले, “शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आणि शिवसैनिकांनी या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे.”

Uddhav Thackeray Comment on Eknath Shinde Group

अधिवेशनाच्या आजच्या दिवशी गरमागरमी पाहायला मिळाली. अबू आझमी यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर सर्वच पक्षांनी एकत्रित भूमिका घेतली, तर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका करत ‘छावा’ चित्रपट गद्दारांना दाखवण्याची उपरोधिक मागणी केली. या अधिवेशनातील घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन उलथापालथ होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे, तर शिंदे गटावर टीका करून त्यांनी (Uddhav Thackeray) आगामी राजकीय रणधुमाळीसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या

मुंबई । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज विधिमंडळाच्या सभागृहात हजेरी लावत विविध मुद्द्यांवर …

पुढे वाचा

Mumbai Maharashtra Marathi News Politics