🕒 1 min read
मुंबई । संतोष देशमुख यांच्या हत्येचे (Santosh Deshmukh Murder Case) धक्कादायक फोटो समोर आल्यानंतर आणि जनतेत संतापाची लाट उसळल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला. मात्र, या निर्णयास विलंब का झाला, यावर अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “ही घटना घडल्यानंतर मी त्वरित सीआयडी चौकशीचे आदेश दिले. माझा तपासादरम्यान कोणताही हस्तक्षेप झाला नाही. फॉरेन्सिक टीमने डिलीट केलेला मोबाईल डेटा पुनर्प्राप्त केला, त्यामुळे हत्येचे महत्त्वाचे पुरावे समोर आले. हे पुरावे चार्जशीटमध्ये समाविष्ट करण्यात आले असून, त्यानंतरच मी संबंधित फोटो पाहिले.”
Devendra Fadnavis Reaction Dhananjay Munde resignation
फडणवीस पुढे म्हणाले की, “धनंजय मुंडे ( Dhanajay Munde ) यांनी योग्य वेळी राजीनामा दिला का, यावर चर्चा करण्यात मला रस नाही. मात्र, जर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी मंत्र्यांच्या जवळचा असेल, तर नैतिकता लक्षात घेऊन मंत्र्याने जबाबदारी स्वीकारली पाहिजे. निर्णय घेण्यास वेळ लागला, पण शेवटी त्यांनी राजीनामा दिला.”
धनंजय मुंडे यांना राजीनाम्यासाठी दबाव आणला गेला का, या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस ( Devendra Fadanvis )यांनी थेट उत्तर देणे टाळले. “मी जे सांगायचे होते, ते स्पष्टपणे सांगितले आहे. त्यावर अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही,” असे त्यांनी ( Devendra Fadanvis ) स्पष्ट केले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड ( Walmik Karad ) याला मुख्य आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे. कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो, त्यामुळेच मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर जनतेच्या रोषाच्या पार्श्वभूमीवर आणि नैतिक जबाबदारी स्वीकारत धनंजय मुंडे ( Dhanajay Munde ) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी या संपूर्ण प्रकरणात सीआयडीच्या तपासात कोणताही हस्तक्षेप न झाल्याचे स्पष्ट करत, न्यायसंस्थेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “…त्यासाठी वाल्मिक कराडचा बळी’; Manoj Jarange Patil यांच्या आरोपामुळे खळबळ
- “आयोग कार्पोरेट पार्ट्यापुरता, छोट्या भुरट्या ताई…. “; Sushma Andhare यांची जहरी टीका
- “माझी बदनामी करणाऱ्यांवर मी… “; ‘त्या’ आरोपांवर Jayakumar Gore यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










