Manoj Jarange Patil । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर येताच अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यावरून आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
“धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचा (Walmik Karad) बळी दिल्याने त्याच्यावर आता जेलमध्ये सडायची वेळ आली आहे. हे आता कराडच्या कुटुंबाला देखील समजले असेल. त्यामुळे कराडने हत्या, खंडणी आणि गुंडगिरी मुंडेमुळे केले असे कोर्टात सांगून टाकावे,” असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
कृष्णा आंधळे याच्यावरूनही जरांगे पाटील यांनी मुंडेंवर निशाणा साधला. “धनंजय मुंडे यांनी कृष्णा आंधळेला पळून जाण्यासाठी मदत केली. त्याचा मोबाईल फेकून दिला. त्यामुळे देशमुखांची हत्या झाल्यापासून राजीनामा होईपर्यंत, त्यांचे कॉल डिटेल्स तपासावे,” अशी मागणी जरांगे यांनी केली.
“मुडेंना पुरवणी जबाबात घेणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना मंत्रिपद आणि आमदार पदापासून त्यांना दूर ठेवून कलम ३०२ मध्ये त्यांना अटक झाली पाहिजे. त्यांचे कार्यालय कराड चालवत होता. त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे,” असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Manoj Jarange Patil target Dhananjay Munde
मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांवर धनंजय मुंडे त्यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :