Share

“माझी बदनामी करणाऱ्यांवर मी… “; ‘त्या’ आरोपांवर Jayakumar Gore यांचा इशारा

by MHD
Jayakumar Gore explanation on Photo Controversy

Jayakumar Gore । ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे मंत्री जयकुमार गोरे सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. महिलेला विवस्त्र फोटो (Jayakumar Gore Photo Controversy) पाठवल्याचा आरोप करत विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यावरून राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे.

आरोप झाल्यानंतर जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी संवाद साधत याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “2017 साली एक गुन्हा दाखल झाला होता. 2017 साली विधान परिषदेच्या निवडणूकीनंतर नगरपालिकेची निवडणूक होती. निवडणुकीच्या दोन दिवसांपूर्वी माझ्यावर एक गुन्हा दाखल झाला आणि त्यावर ट्रायल होऊन 2019 साली त्याचा निकाल लागला. त्यात कोर्टाने मला निर्दोष मुक्त केले आहे,” असे जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Jaykumar Gore nude photos)

“त्यावेळी जप्त करण्यात आलेला मुद्देमाल, फोन हे नष्ट करण्याचा आदेश त्याचवेळी कोर्टाकडून देण्यात आला होता. विरोधकांनी सहा वर्षांपूर्वीचं हे प्रकरण पुन्हा उकरून काढले असून वडिलांच्या निधनानंतर त्यांचे अस्थिविसर्जनही मला करू दिले नाही. विरोधकांनी खालच्या पातळीचे राजकारण केले आहे,” असा गंभीर आरोप गोरे यांनी केला आहे.

“मी अजूनही त्या महिलेला त्रास देत आहे, असा आरोप माझ्यावर केला जात आहे. जर मी या महिलेला त्रास दिला असेल तर पोलिसांनी चौकशी करा. जर या तपासामध्ये मी किंवा संबंधित महिला जो कोणी दोषी असेल तर कारवाई करावी,” अशी मागणी देखील जयकुमार गोरे यांनी केली आहे.

Jaykumar Gore Responds on Renewed Allegations

पुढे ते म्हणाले की, “ज्यांनी माझ्यावर आरोप केले, त्या प्रत्येकावर मी आजच सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे. त्याशिवाय ज्यांनी माझी बदनामी केली त्या संबधितांवर मी अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार आहे,” असा इशारा जयकुमार गोरे यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Responding to the allegation of sending a nude photo to a woman, Jayakumar Gore has warned the opposition.

Politics Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now