Namdev Shastri । सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामधून संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचे धक्कादायक फोटो आणि फोटो समोर आले आहेत. यामुळे संतोष देशमुख कुटुंबियांसह संपूर्ण महाराष्ट्राला खूप मोठा धक्का बसला आहे.
यावर आता भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविषयी मी पहिल्या दिवशी जे वक्तव्य केले होते ते अजाणतेपणातून केले होते. मनुष्य आहे असे होत असते. तुटपुंज्या माहितीच्या आधारावर मी ते वक्तव्य केले होते,” असे नामदेव शास्त्री यांनी म्हटले आहे.
“संतोष देशमुख कुटुंबीयांनी माझी भेट घेत हे किती भयंकर क्रौर्य आहे याची मला जाणीव करून दिली. त्यावेळी माझे अंतकरण दुखावलं. मी न्यायालयाला विनंती करतो की केस फास्ट ट्रॅक वरती घेऊन आरोपींना शिक्षा मिळावी. भगवानगड सदैव देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे,” असे नामदेव शास्त्री यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, बीड पालकमंत्री पदाची जबाबदारी घेताच अजित पवार (Ajit Pawar) पहिल्यांदा बीडच्या दौऱ्यावर होते. त्याच दिवशी संध्याकाळी धनंजय मुंडे भगवानगडावर नामदेव शास्त्री यांच्याशी भेट घेत प्रदीर्घ चर्चा केली होती.
Namdev Shastri on Dhananjay Munde
दुसऱ्याच दिवशी नामदेव शास्त्रींनी पत्रकार परिषद घेतली होती. “धनंजय मुंडे खून करु शकत नाहीत. ते आरोपी नाहीत. धनंजय मुंडेंना टार्गेट केले जात असून ते जर आमच्या क्षेत्रात असते तर संत झाले असते,” असे वक्तव्य नामदेव शास्त्रींनी केले होते. त्यानंतर त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता. देशमुख कुटुंबीयांनी भेट घेताच त्यांनी भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठिशी उभा असल्याचे स्पष्ट केले होते.
महत्त्वाच्या बातम्या :