Jaykumar Gore । मागील काही दिवसांपासून महायुती सरकारमधील नेते अडचणीत सापडत आहेत. मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate), आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यानंतर आता ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे मंत्री जयकुमार गोरे अडचणीत आले आहेत.
जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वत:चे नग्न फोटो पाठवले आहेत, असा आरोप केला जात आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावरून महाविकास आघाडीने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
“हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील महिलेचा जयकुमार गोरे यांनी छळ आणि विनयभंग केला आहे. ही माहिती अत्यंत गंभीर आणि महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. जयकुमार गोरे हे विकृत मंत्री आहेत,” असा घणाघात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी देखील जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “पश्चिम महाराष्ट्रातला पैलवान मंत्री विवस्त्र फोटो महिलेला पाठवतो. १० दिवस जेलची हवा खाऊन येतो. १० हजार रुपयांचा न्यायालयात दंड भरून पुन्हा त्या महिलेला ब्लॅकमेल करतो,” असा मोठा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
Jaykumar Gore Photo Controversy
संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी जयकुमार गोरे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. याप्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि जयकुमार गोरे काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :