भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक रजनीकांत ( Rajinikanth ) यांची लोकप्रियता प्रचंड आहे. त्यांच्या अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. मात्र, त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एका मोठ्या सत्याचा खुलासा करत दारूच्या व्यसनावर प्रामाणिक मत व्यक्त केले. त्यांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरू असून, त्यांनी दिलेला संदेश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
एका कार्यक्रमात रजनीकांत यांनी आपल्या पूर्वीच्या जीवनशैलीविषयी सांगताना दारूच्या व्यसनाबद्दल मोकळेपणाने मत व्यक्त केले. ते म्हणाले, “दारूचे व्यसन ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. मी असे म्हणत नाही की दारू अजिबात पिऊ नका, पण रोजची सवय मात्र ठेऊ नका. हे केवळ शरीरासाठीच नव्हे, तर मानसिक आनंदासाठीही घातक आहे. कधीमधी आनंदाच्या क्षणी घेतली तर ठीक, पण व्यसन करू नका.”
त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, “जर मी दारूच्या आहारी गेलो नसतो, तर समाजासाठी अधिक चांगले कार्य करू शकलो असतो.” यापूर्वीही त्यांनी आपल्या व्यसनमुक्तीच्या प्रवासाविषयी सांगितले होते की, “कंडक्टर म्हणून काम करत असताना मी रोज दारू प्यायचो आणि सिगारेट ओढायचो. मात्र, माझी पत्नी लता हिने मला या सगळ्यापासून दूर नेले.” ( If there was no alcohol in my life, I would have served the society. Alcoholism is the biggest mistake of my life,” he told the audience. )
Rajinikanth speaks about drinking habits
त्यांनी त्यांच्या चाहत्यांना चेतावणी देत असेही सांगितले की, “मांसाहार, दारू आणि सिगारेट यांचे दीर्घकाळ सेवन आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरते. ज्यांना निरोगी आणि आनंदी जीवन जगायचे असेल, त्यांनी या सवयींचा त्याग करावा.”
रजनीकांत यांनी दिलेला दारूविषयक संदेश आणि त्यांचा प्रामाणिक स्वीकृतीचा दृष्टिकोन हे निश्चितच चाहत्यांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटासाठी प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. रजनीकांत यांचे अनेक प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेले आगामी चित्रपट आहेत. त्यापैकी काही महत्त्वाचे प्रोजेक्ट्स.
1. लाल सलाम
- दिग्दर्शक: ऐश्वर्या रजनीकांत
- मुख्य भूमिका: रजनीकांत (विशेष भूमिका), विशाल, विक्रांत, आणि अन्य कलाकार
- प्रदर्शन तारीख: 2024
- वर्णन: हा चित्रपट सामाजिक आणि राजकीय कथानकावर आधारित असून, रजनीकांत यात कॅमिओ किंवा विशेष भूमिका साकारत आहेत.
2. थलैवर 171
- दिग्दर्शक: लोकेश कनगराज
- प्रमुख कलाकार: रजनीकांत पण अद्याप अधिकृत घोषणा नाही
- वर्णन: हा एक अॅक्शन-थ्रिलर चित्रपट असण्याची शक्यता असून, लोकेश कनगराज यांच्या अनोख्या स्टाईलमध्ये सादर होणार आहे.
याशिवाय, रजनीकांत आणखी काही प्रोजेक्ट्सवर चर्चा करत आहेत, जे लवकरच अधिकृतरीत्या जाहीर होऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या