Share

सुपरस्टार रजनीकांत साठी श्रीदेवीने ठेवला ७ दिवसांचा उपवास

sridevi 7 days fasting for superstar rajinikanth here is the reason

Published On: 

sridevi 7 days fasting for superstar rajinikanth here is the reason

🕒 1 min read

बॉलिवूडच्या दिवंगत सुपरस्टार श्रीदेवी ( Sridevi  ) यांनी त्यांच्या अभिनय आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यांनी बॉलिवूडमध्ये एक अभूतपूर्व काळ गाजवला आहे. त्यांचे वैयक्तिक जीवनही नेहमीच चर्चेचा विषय राहिले होते, विशेषतः जेव्हा त्यांनी बोनी कपूर यांच्याशी लग्न केले. यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले होते.

पण, श्रीदेवींच्या आयुष्यात एक महत्त्वपूर्ण व्यक्ती अशी होती, ज्यासाठी त्यांनी सात दिवसांचा उपवास केला. तो व्यक्ती म्हणजे, दक्षिण भारतातील सुपरस्टार रजनीकांत. रजनीकांत हे भारतीय चित्रपटसृष्टीचे अत्यंत प्रतिष्ठित कलाकार आहेत, त्यांना अनेक लोक देव मानतात. श्रीदेवी आणि रजनीकांत यांचे नाते खूप जुने आणि गहिरे होते. दोघांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते, आणि त्यांची जोडी प्रेक्षकांना फार आवडली होती.

रजनीकांत आणि श्रीदेवी यांनी तामिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी अशा चार भाषांमध्ये एकत्र १९ चित्रपटांमध्ये काम केले होते. एक गोष्ट विशेष म्हणजे, श्रीदेवीने रजनीकांतच्या आईची भूमिका साकारली होती. त्यांचा पहिला चित्रपट ‘मुंद्रू मुदिचू’ होता, ज्यामध्ये श्रीदेवीने १३ वर्षांच्या वयात रजनीकांतच्या आईची भूमिका केली होती.

दोघांमधील मैत्री अतिशय खास होती. रजनीकांत श्रीदेवीपेक्षा १३ वर्षांनी मोठे होते, आणि असे मानले जाते की ते श्रीदेवीवर अत्यंत प्रेम करत होते. एक वेळ अशी आली होती की रजनीकांत यांनी श्रीदेवीच्या आईला श्रीदेवी सोबत लग्न करण्याबद्दल बोलले होते, त्या वेळी श्रीदेवी फक्त १६ वर्षांची होती.

sridevi 7 days fasting for superstar Rajinikanth

“राणा” चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रजनीकांत गंभीरपणे आजारी पडले होते. त्यांची तब्येत खूप बिघडली होती. श्रीदेवीला जेव्हा याबद्दल माहिती मिळाली, तेव्हा त्या खूप चिंतित झाल्या. त्यासाठी, श्रीदेवींनी सात दिवसांचा उपवास केला आणि रजनीकांत लवकर बरे होण्यासाठी शिर्डीच्या साईबाबा मंदिरात जाऊन प्रार्थना केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Entertainment Marathi News

Join WhatsApp

Join Now