Dayaben । तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका घराघरांत पोहोचली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. परंतु, या मालिकेमध्ये दयाबेनची भूमिका मागील अनेक वर्षांपासून रिकामी होती.
कारण दिशा वकानीने (Disha Vakani) 2018 पासून या मालिकेकडे पाठ फिरवली, पण ती परत मालिकेत परतलीच नाही. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) दयाबेनसाठी योग्य चेहरा शोधत होते. अखेर त्यांना दयाबेन या पात्रासाठी एक अभिनेत्री मिळाली आहे.
ती अभिनेत्री कोण आहे? याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. पण सध्या तिच्यासोबत मॉक शूटिंग सुरू आहे. आठवडाभर हे शूटिंग सुरु राहील. त्यानंतर तिची निवड होईल. जानेवारी २०२५ मध्ये असित मोदी यांनी दिशा वकानीच्या कमबॅकबद्दल माहिती दिली होती.
Dayaben Come Back
“मी अजूनही प्रयत्न करत असून मला असं वाटतं दिशा वकानी परत येऊ शकत नाही. तिला दोन मुले आहेत. ती माझ्या बहिणीसारखी आहे. तिने मला राखी बांधली आहे. तिचे वडील आणि भाऊ देखील माझ्यासाठी कुटुंब आहेत. जेव्हा तुम्ही १७ वर्षे एकत्र काम करता तेव्हा ते तुमचं मोठं कुटुंब बनतं,” असे असित मोदी म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या :