Disha Salian । दिशा सालियन मृत्यूप्रकरणी (Disha Salian death case) तिचे वडील सतीश सालियन (Satish Salian) यांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केल्याने पाच वर्षांनंतर हे प्रकरण चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. या प्रकरणी ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. अशातच आता सतीश सालियनचे विवाहबाह्य संबंध होते, त्यासाठी ती त्यांना पैसे देत असायची. त्यामुळे ती निराश होती असा देखील आरोप केला जाऊ लागला आहे. यावर आता शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी मोठा आरोप केला आहे.
“मालवणी पोलिसांनी कालच या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दिला असून यात आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याचं राजकीय षडयंत्र सुरू आहे, असे पाहायला मिळत आहे. मी गृहमंत्री असल्यापासून हेच सांगत आलो आहे, की हे एक षडयंत्र आहे,” असे अनिल देशमुख म्हणाले.
Nilesh Ojha on Disha Salian death case
दरम्यान, मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टवर सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा (Nilesh Ojha) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “दिशाचा मित्र रोहन राय याने वर्षभरानंतर एका मुलाखतीत दिशाच्या मृत्यूबाबत खुलासा केला होता. ही 15 नोव्हेंबर 2022 रोजी वृत्तपत्रात मुलाखत छापली होती. दिशा प्राण्यांच्या समस्यांबाबत फार संवेदनशील होती, केरळमध्ये एका गरोदर हत्तीणीसोबत घडलेल्या घटनेने ती नैराश्येत होती असे यात म्हटलं होतं,” असे ओझा म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :