Share

ED कायदा राजकीय हस्तक्षेपासाठी वापरला जातो, बदल आवश्यक; सत्तेचा गैरवापर थांबवावा

Sharad Pawar criticized the misuse of the ED law during Sanjay Raut’s book launch, revealing his past opposition to certain provisions and urging reforms in political power misuse.

Published On: 

Sharad Pawar criticized the misuse of the ED law during Sanjay Raut’s book launch, revealing his past opposition to certain provisions and urging reforms in political power misuse.

मुंबई – खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला खासदार शरद पवार, गीतकार जावेद अख्तर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

शरद पवार यांनी या वेळी सरकारच्या विरोधकांवर सूडभावनेतून कारवाई झाल्याचा आरोप करत पी.एम.एल.ए. कायद्यातील तरतुदींवर विरोध व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्रिमंडळात असताना या कायद्यातील दुरुस्तीसाठी प्रस्ताव आला होता, ज्याला त्यांनी विरोध केला.

Sharad Pawar opposes ED law misuse

“मी मनमोहन सिंगांना सांगितले की, हा प्रस्ताव अत्यंत घातक आहे आणि तो स्वीकारला जाऊ नये,” असे शरद पवार म्हणाले. त्यांच्या मते, सत्तेचा गैरवापर याच तरतुदीमुळे झाला आणि पहिली कारवाई त्याच काळातील चिदंबरम यांच्यावर झाली होती.

संजय राऊतांच्या पुस्तकात एनडीए आणि यूपीए सरकारच्या काळातील ED कारवाईंचा आढावा दिला आहे. शरद पवार म्हणाले की, या पुस्तकानंतर जनतेने राजकीय पक्षांचा अधिकार आणि ED कायद्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

शरद पवार यांनी सांगितले की, एनडीए सरकारच्या काळात २१ जणांवर कारवाई करण्यात आली होती, तर यूपीएच्या काळात ९ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र, अटक कुणाला केली गेली नाही.

एनडीएच्या काळात काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादी, शिवसेना, द्रमुक, बीजू जनता दल, आरजेडी, बसपा, सपा, टीडीप, आप, मार्क्सवादी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, मनसे, अण्णा द्रमुक आणि टीआरएस अशा अनेक पक्षांच्या नेत्यांवर चौकशा करण्यात आल्या आणि त्यांच्याविरुद्ध केसेस दाखल केल्या गेल्या, असेही शरद पवार म्हणाले.

त्यांनी पुढे म्हटले की, ईडी कायद्याचा आधार घेऊन राजकीय पक्षांचा अधिकार उद्ध्वस्त करण्यासाठी जी तरतूद आहे, ती बदलावी लागेल, अशी त्यांची अपेक्षा आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही