Share

दुहेरी लूट! शेतकऱ्यांकडून आरटीओचा 3500 रुपयांपर्यंत हप्ता तर शहरात अवैध डान्सबार-मटका

In Solapur, farmers allege RTO and police officers demand ₹1500–₹3500 monthly bribe for agricultural transport. Minister Jaykumar Gore warns officers of strict action.

Published On: 

In Solapur, farmers allege RTO and police officers demand ₹1500–₹3500 monthly bribe for agricultural transport. Minister Jaykumar Gore warns officers of strict action.

सोलापूर | कृषी माल वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांकडून आरटीओ आणि पोलीस अधिकारी हप्ता वसूल केला जात असल्याच्या तक्रारी सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) बैठकीत माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी केल्या. त्यांनी थेट पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समोर आरटीओ अधिकाऱ्यांचे “रेट कार्ड” मांडले.

या बैठकीत आमदारांनी आरोप केला की, शेतकऱ्यांकडून 1500 ते 3500 रुपयांपर्यंत दरमहा वसुली केली जाते. ओव्हरलोड वाहनांवर कारवाई न करता, केवळ शेतमाल वाहून नेणाऱ्या गाड्यांना अडवले जाते. एका शेतकऱ्याकडून तर तब्बल 26 हजार रुपयांचा दंड आकारल्याची माहितीही समोर आली.

Solapur farmers accuse RTO and police officers

या गैरप्रकारांमुळे संतप्त झालेल्या पालकमंत्री गोरे यांनी अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला – “शेतकऱ्यांना त्रास दिलात, तर तुमचा कार्यक्रम करू!” त्यांनी स्पष्ट सांगितले की, “तुमचं नियमानुसार काम आम्हाला माहित आहे. पुन्हा अशी तक्रार आली, तर कारवाई होईल.”

या बैठकीत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केल्याचे सांगितले. तर भाजपचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापुरात डान्सबार, मटका यांसारख्या गैरकृत्यांवर आवाज उठवला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही