🕒 1 min read
बीड – जिल्ह्यातील परळीमध्ये ( Parli ) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दहा ते बारा जणांच्या टोळक्याने लाठ्या-काठ्यांनी एका युवकाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. ही घटना 16 मे 2025 रोजी घडली असून, एका सार्वजनिक कार्यक्रमात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवराज दिवटे या युवकाला टोकवाडी शिवारात नेऊन अमानुष मारहाण करण्यात आली. मारहाण करण्याआधी त्याचे अपहरण करण्यात आले होते. सध्या शिवराजवर अंबाजोगाईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणानंतर दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी जखमी शिवराजची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांनी बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत, बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची लवकरच भेट घेणार असल्याचे जाहीर केले.
Parli Violence: Youth Brutally Beaten by Mob
धनंजय देशमुख म्हणाले, “या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची पार्श्वभूमी शोधून त्यांच्यावर कठोर शासन झाले पाहिजे. आरोपी तरुणांचे वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान आहे आणि त्यांना गुन्हेगारीची शिकवण दिली जात आहे. एफआयआरमध्ये जे नावं आहेत, त्यात बदल न करता आरोपींची संख्या वाढवायला हवी.”
यावर, शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांनीदेखील शिवराजची भेट घेतली असून, त्यांनी डीवायएसपीसी यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, पीडित कुटुंबावर दबाव टाकला जात असून, पोलिसांनी कोणताही बदल न करता कठोर कारवाई करावी.
📌 महत्वाच्या बातम्या
- शिवराजला मारणाऱ्यांवर मकोका लागला पाहिजे, बीडची पोलीस यंत्रणा कुचकामी – धनंजय देशमुख
- IPL 2025: प्लेऑफची आशा टिकवण्यासाठी दिल्लीची गुजरातविरुद्ध परीक्षा
- प्लेऑफ्सची आशा टिकवण्यासाठी पंजाबची आरपारची लढत, राजस्थानसाठी प्रतिष्ठेचा मुकाबला