GT vs MI । मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएलच्या 18 व्या मोसमात पहिला सामना गमावला. मुंबईचा चेन्नई सुपर किंग्सने दारुण पराभव केला. अशातच आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये (Gujarat Titans) दुसरा सामना पार पडणार आहे.
गुजरातने देखील पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे आज दोन्ही संघ विजयाचे खाते उघडण्यासाठी विशेष प्रयत्न करतील. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये चाहत्यांना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा थरार पाहायला मिळेल.
मुंबईच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार आहे. मुंबईचे पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव याने नेतृत्व केलं होतं. पण आता आज होणाऱ्या सामन्यात हार्दिक पांड्या आता मुंबईचे नेतृत्व करणार आहे. हार्दिकच्या नेतृत्वात मुंबई विजयाचे खाते उघडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
GT vs MI IPL 2025 Match Where To Watch On TV?
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Gujarat Titans vs Mumbai Indians) सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.
GT vs MI IPL 2025 Match Live Streaming Details
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामने डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहेत.
Mumbai Indians Team :
रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोपले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर आणि कृष्णन श्रीजीथ.
Gujarat Titans Team :
साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), राहुल तेवतिया, शाहरुख खान, अर्शद खान, रवि श्रीनिवासन साई किशोर, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, शेरफेन रदरफोर्ड, ग्लेन फिलिप्स, इशांत शर्मा, अनुज रावत, वॉशिंग्टन सुंदर, महिपाल लोमरोर, जयंत यादव, निशांत सिंधू, कुलवंत खेजरोलिया, करीम जनात, जेराल्ड कोएत्झी, मानव सुथार, कुमार कुशाग्रा आणि गुरनूर ब्रार.
महत्त्वाच्या बातम्या :