Kunal Kamara । कॉमेडियन कुणाल कामरा हा सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दलच्या केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. कुणाल कामराचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत.
यामुळे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. अशातच आता मद्रास हायकोर्टाकडून त्याला मोठा दिलासा मिळाला आहे. कुणाल कामरा याला 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, कुणाल कामरा हा 31 मार्च रोजी मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार असून त्याला ७ एप्रिल पर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. महत्त्वाचे म्हणजे कुणाल कामराने मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
यामध्ये त्याने अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती. तसेच 2021 पासून मी तामिळनाडूत राहत असून मुंबई पोलीस माझ्यावर अटकेची कारवाई करू शकतात, त्यासाठी अंतरिम जामीन द्यावा असं त्याने याचिकेत म्हटलं होते.
Comedian Kunal Kamra gets anticipatory bail granted
कुणाल कामराला जामीन देताना कोर्ट म्हणाले की, “कामरा राज्यातील कोर्टापर्यंत याचिका दाखल करण्यासाठी पोहचू शकत नाही, असे सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांना अंतरिम जामीन देण्याच्या निर्णयापर्यंत कोर्ट आले आहे, असे आदेशात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :