Sanjay Raut । उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर विडंबनात्मक गाणं केल्यानंतर कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याच्यावर मुंबईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच त्याला चोप देण्याची भाषा शिंदे गटाचे मंत्री करत आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
यामुळे कामराने मद्रासच्या हायकोर्टातून ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मिळवला आहे. अशातच आता कुणाल कामरा याच्यावरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. “आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे,” असा सल्ला संजय राऊत यांनी कामराला दिला.
“तो अल कायद्याचा सदस्य आहे का? किंवा तो देशद्रोही, दहशतवादी, फुटिरतावादी आहे का? एकनाथ शिंदे यांच्या लोकांना कामरा शत्रू वाटतो म्हणून आम्ही त्याच्याशी बोलायचे नाही का?,” असा सवाल संजय राऊत यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, “आम्हालाही वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे या राज्याचे शत्रू आहेत. शिंदे गट तर त्यांच्या पायाशी जाऊन बसतो. आम्ही आमच्या भूमिका मांडत राहू,” अशी भूमिका राऊत यांनी केली.
Sanjay Raut Criticized Shinde group
“ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांच्यावर हक्कभंग आणला असेल तर त्यांच्या आमदारांचा हक्क आहे. त्यावर आम्ही उत्तर देऊ,” असेही यावेळी संजय राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :