🕒 1 min read
नाशिक– राजकारणात जिंकण्यासाठी ‘टार्गेट’ सेट करावं लागतं, आणि ते कसं करायचं हे राज ठाकरेंनी बरोबर हेरलंय. नाशिकच्या सभेत बोलताना समोरच असलेल्या एका क्रिकेटच्या स्कोअरबोर्डकडे बोट दाखवत राज यांनी नाशिककरांकडे थेट ‘शंभर’चा आकडा मागितलाय. “समोर टोटल लिहिली आहे, मला तिथे १०० चा आकडा पाहिजे, कुठेही गाफिल राहू नका,” असे आदेशच त्यांनी (Raj Thackeray) कार्यकर्त्यांना आणि मतदारांना दिले आहेत. राज ठाकरेंच्या या आक्रमक पवित्र्यामुळे नाशिकचं राजकारण चांगलंच तापलं आहे.
Raj Thackeray Nashik Speech
“खड्ड्यात उभा करून मारेन…” राज ठाकरेंचा ‘दम’ कसा असतो, याची आठवण त्यांनी पुन्हा एकदा करून दिली. आपल्या जुन्या कामांचा दाखला देताना ते म्हणाले की, नाशिकमध्ये रस्ते बनवताना कंत्राटदारांना मी स्पष्ट सांगितलं होतं, “बजेटमध्ये पैसे कमी पडले तर सांगा, पण रस्ता झाल्यानंतर खड्डा पडला, तर त्याच खड्ड्यात उभा करून मारेन.” त्यांच्या या इशार्यामुळेच नाशिकमध्ये उत्तम रस्ते झाले आणि विरोधकांना ५ वर्षांत भ्रष्टाचाराचा एकही आरोप करता आला नाही, असा दावा राज यांनी छातीठोकपणे केला.
फक्त रस्तेच नाही, तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरही (Devendra Fadnavis) सडकून टीका केली. “नाशिक दत्तक घेणार होतात ना? मग त्या आयटी पार्क, मेट्रो आणि रिंग रोडचं काय झालं?” असा सवाल करत त्यांनी भाजपच्या ‘विकासाच्या’ गप्पांची हवाच काढून टाकली.
लाडकी बहीण आणि महागाईचं गणित सध्या गाजत असलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचीही राज ठाकरेंनी चिरफाड केली. ते (Raj Thackeray) म्हणाले, “सरकार तुम्हाला १५०० रुपये देतंय, पण गॅस सिलिंडरही १५०० रुपयांवर नेलाय. महागाईने तुमचे पैसे गिळलेत, मग हाती काय उरलं?” मतदारांनी पैशासाठी विकलं जाऊ नये, असं कळकळीचं आवाहनही त्यांनी केलं. “आज पैसे घ्याल, पण उद्या पोरं विचारतील की आमचं भविष्य का विकलं? तेव्हा काय उत्तर देणार?” हा प्रश्न उपस्थित करत त्यांनी उपस्थितांच्या काळजाला हात घातला. आता राज आणि उद्धव ठाकरेंच्या या युतीला नाशिककर १०० चा जादुई आकडा देतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- “टांगा पलटी, घोडे फरार..!”; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना ‘अल्टिमेटम’; नवी मुंबईत महायुतीतच ‘महायुद्ध’!
- पार्थ पवारांच्या अडचणी वाढणार? फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – “तो १०० टक्के घोटाळाच!”
- ऑनलाइन जेवण मागवताय? सावधान! ‘या’ अभिनेत्रीसोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही होऊ शकतं!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











