Ambadas Danve । केंद्रीय मंत्री असताना २३ ऑगस्ट २०२१ रोजी नारायण राणे (Narayan Rane) यांना जेवणाच्या ताटावरून उठवत अटक करण्यात आली होती. नारायण राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. या घटनेची आठवण करून देत नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला.
Ambadas Danve Criticized Nitesh Rane
“त्या अटकेचा क्षण आजही माझ्या मोबाईल मध्ये सेव करून ठेवलेला आहे. ज्या दिवशी परतफेड करेल त्याच दिवशी तो व्हिडिओ डिलीट करेन. कुणालाही सोडणार नाही”, असा इशारा नितेश (Nitesh Rane) यांनी दिला. यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी नितेश राणेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
नितेश राणे यांनाही जेलमध्ये जावं लागणार असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हंटलंय. “नारायण राणे हे एक दिवस जेलमध्ये होते, पण ज्या पद्धतीने नितेश राणे महाराष्ट्रात वक्तव्य करत आहेत त्यांना लांबचा मुक्काम होऊ शकतो”, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :