Sambhaji Bhide | साईबाबांची लायकी तपासा आणि मग पूजा करा – संभाजी भिडे

Sambhaji Bhide | टीम महाराष्ट्र देशा: मनोहर उर्फ संभाजी भिडे हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आहे. त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

हा वाद सुरू असताना भिडेंनी पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य केलं आहे. भिडेंनी आता अनेकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांबद्दल मोठं विधान केलं आहे.

Don’t consider Sai Baba as Hindu God – Sambhaji Bhide

संभाजी भिडे (Sambhaji Bhide) म्हणाले, “आपला हिंदू समाज साईबाबांची पूजा करतो. मात्र, लोकांनी साईबाबांची पूजा करण्याआधी एकदा त्यांची लायकी तपासायला हवी.

लोकांनी साईबाबांना त्यांच्या घरातून आणि घरातील देवघरातून बाहेर काढून फेकायला हवं. साईबाबांना हिंदूंचा देव मानू नका. मी हे सर्व जबाबदारीने बोलत आहे. कारण मी काही डोकं सटकलेला माणूस नाही.”

दरम्यान, दोन-तीन दिवसांपूर्वी संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “महात्मा गांधी एका मुस्लिम जमीनदाराचे पुत्र आहे.

करमचंद गांधी एका मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते. एक दिवस करमचंद गांधी हे त्या मुस्लिम जमीनदाराची मोठी रक्कम चोरून पळून गेले.

त्यानंतर चिडलेल्या जमीनदाराने त्यांच्या चौथ्या पत्नीला म्हणजेच महात्मा गांधीजींच्या आईला आपल्या घरी पळवून आणले. त्यानंतर त्याने त्यांच्यासोबत पत्नीसारखा व्यवहार केला. म्हणून महात्मा गांधीजींचे खरे वडील करमचंद गांधी नसून ते मुस्लिम जमीनदार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.